History [Std 6]

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची मांडणी केलेली आहे. ती महाराष्ट्रकेंद्री आहे. विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभावना अधिक परिपक्व करण्यासाठी इतिहास समजून घ्यावा लागतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान विद्यार्थ्यांसमोर ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी काय कार्य केले. हे स्पष्ट केले की राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भानही विकसित होईल. वरील सर्व बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रत्येक पाठाची माहिती दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. प्रजेला सुखी केले. त्याकाळची परिस्थिती पाहता अवघड व कठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठ्या जोखमा पत्करून केले. हे पाहिले असता असे लक्षात येते की *”न भूतो न भविष्यती”* अशी महान कामगिरी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील उत्तरेकडून आलेल्या आक्रमणास महाराष्ट्राने तोंड दिले. स्वराज्य रक्षण केले. असा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला,सांगितला जात आहे.

 

श्री.गिरी सुरेश दशरथराव, (सहशिक्षक),

संस्कार विद्यालय बीड